Assignment 1

असाइनमेंट 1
      


   

                              A- मध्ययुगीन संक्रामण काल

प्रकरण 2 मध्ययुगीन भारत व राजकीय घडामोडी या प्रकरणातून आपण खालील गोष्टी जाणून घेऊ . उत्तर भारतात राज्य केलेली राजपूत घराणी . साहित्य , कला आणि शिल्पकलेतील राजपुतांचे योगदान . • तुर्काचे आगमन , महम्मद गझनी आणि महम्मद घोरीच्या भारतावरील स्वाऱ्यांचे परिणाम . • दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना , राज्यकारभार आणि त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान 12 व्या शतकाचा उत्तरार्ध व 13 व्या शतकाचा पूर्वार्ध हा भारताच्या इतिहासातील ' संक्रमणकाल म्हणून ओळखला जातो . संक्रमण म्हणजे एखाद्या समाजाने एका कालखंडातून दुसऱ्या कालखंडात प्रवेश करण्यासाठी केलेली पूर्वसिद्धता होय . या कालखंडात भारताचा प्राचीन युगातून मध्ययुगात प्रवेश झाला . छोटी छोटी राज्ये तुर्कानी नष्ट करुन उत्तर भारतात बलिष्ठ साम्राज्याची स्थापना केली . याकालात इस्लाम धर्माच्या प्रभावामुळे धार्मिक क्षेत्रात एकेश्वरवादाचा प्रसार झाला . यावरुन भारतात मध्ययुगाची सुरुवात झाली याबद्दलची कल्पना येते . तुर्कानी स्थापन केलेल्या साम्राज्याचा अभ्यास करण्याआगोदर तुर्काचे आगमन व पूर्वेकडील विविध राज्यातील राजकीय पद्धतींचे विश्लेषण करणे अगत्याचे आहे . छोट्या छोट्या प्रांतातील राज्यकारभार म्हणजेच विविध राज्यातील राजकीय व्यवस्था असा त्याचा अर्थ होतो . 9 व्या शतकापासून 13 व्या शतकाच्या मध्यापर्यंत पश्चिम व उत्तर भारताच्या विविध भागात राज्यकारभार केलेल्या राजपूत घराण्यांच्या राज्य व्यवस्थेचा अभ्यास आपण करुया . राजपूत घराणे स्थानेश्वराच्या वर्धन घराण्यानंतर पश्चिम उत्तर भारतातील बहुतांश भागात गुर्जर , प्रतिहार , बदलबहाचे चंदेल , गढवाल , सोळंकी , परमार व चौहान ही प्रमुख घराणी उदयास आली . 12 व्या शतकात उत्तर भारतात पृथ्वीराज चौहान व जयचंद गढवाल , परमर्दीदेवचंदेल हे प्रमुख राजे होते . गुर्जर प्रतिहार : गुर्जर स्वतः ला रामायण काळातील सूर्यवंशी व क्षत्रिय लक्ष्मण हा आपल्या वंशाचा मन सम्धापक आहे असे मानत असत . परंतु उपलब्ध पुराव्याच्या आधारे ' नागभट्ट ' हे त्या वंशाचे संस्थापक आहेत . हे समजते , कनोज ही त्यांची राजधानी होती . प्रतिहारांनी सिंध प्रांतावर आपले आधिपत्य गाजवले व वरचेवर हल्ले करणाऱ्या अरबांना त्यानी पळवून लावले . मिहीर भोज हा या वंशाचा दुसरा महत्त्वाचा राजा . त्याने पालांचा राजा नारायण पालाचा पराभव करुन आपल्या राज्याचा विस्तार.
                                                                                                           बंगालपर्यंत केला . अरबी प्रवासी सुलेमान व अल्मसुदा यांनी त्याच्या दरबाराला भेट दिली . व त्यांच्या राज्यात असणाऱ्या सुख , शांती , समाधानाबद्दल प्रशंसा केली . महेंद्र पालानंतर त्याचा मुलगा महिपाल हा गादीवर आला . त्यानंतर प्रतिहार घराण्याचा व्हास झाला . गढवाल या घराण्याचा संस्थापक चंद्रदेव याने उत्तर भारताचा बहुतांश भाग जिंकून घेऊन वाराणशी हे आपल्या राज्यकारभाराचे प्रमुख केंद्र बनविले . या घराण्यातील गोविंदचंद्र या राजाने पालांचा पराभव करून मालवा व मगधपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला . कलिंग व ओरिसा राज्यांचा पराभव त्यांनी केला . काश्मीर , गुजराथ व चोळ या राज्यकर्त्यांशी त्यांचे रोटी बेटीचे व्यवहार होते . पृथ्वीराज चौहान परमार प्रतिहारांच्या हासानंतर माळवा प्रांतावर परमारांची सत्ता स्थापन झाली . राष्ट्रकूटांचा मांडलिक उपेंद्र कृष्णराज हा या घराण्याचा संस्थापक होय . धारानगर ही त्यांची राजधानी होती . परमार वंशाचा प्रसिद्ध राजा भोज याने कल्याणचे चालुक्य , कलिंगचे गंग व उत्तरे कडील कंक यांचा पराभव करुन आपल्या राज्याचा विस्तार केला . पुढे चालुक्यांनी यांचा पराभव केला . राजकीय क्षेत्रामध्ये जय पराजय या दोन्हीची अनुभूती घेतली असली तरी सांस्कृतिक क्षेत्रात ते अपराजित सम्राट मानले जात होते . ते स्वतः कवी होते . या नंतरचे राजे दुर्बल असल्यानेच या घराण्याचा -हास झाला . सोळंकी पहिला मूलराज हा या घराण्याचा संस्थापक होय . या घराण्यातील भीमदेव हा पराक्रमी राजा असला तरी त्याला सोमनाथ देवालयाचे मोहम्मद गझनीच्या हल्ल्यापासून रक्षण करता आले नाही . यांच्यानंतर दुसरा मूलराज व वीरधवल वाघेल हे पराक्रमी राजे होते . दुसऱ्या मूलराजने माऊंट अबू येथे मोहम्मद गझनीचा पराभव केला . या घराण्याच्या कारकीर्दीत प्रसिद्ध जैन विद्वान हेमचंद्र याने ' देशी नाम माला ' नावाचा प्राकृत भाषेतील शब्दकोष लिहिला . अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुफखान आणि नुसतखानने कर्णदेवांचा पराभव करुन ती राज्ये दिल्लीच्या सुलतानाकडे सुपूर्द केली . चंदेल ' ढंग ' हा बुंदेलखंडातील घराण्यातील सुप्रसिद्ध राजा होता . सुरुवातीला चंदेल हे प्रतिहारांचे मांडलिक होते . परमारांच्या पतनानंतर ढंग याने आपण स्वतंत्र राजा असल्याची घोषणा केली . त्याने परमार साम्राज्याचा पूर्वेकडील भाग जिंकला . त्याने पाल व आद्रांचा पराभव करुन राज्याचा विस्तार केला . त्याला ' महाराजाधिराज ' असे म्हटले जात असे . तुर्का विरुद्ध लढणाऱ्या हिंदूशाहीराज जयचंद्र.
                                                                                                     याला सैनिकी पाठबल दिले . रजपूतातील अंतर्गत कलह व एकतेचा अभाव यामुळे त्यांचा खिलजी फडून पराभव झाला . चौहान रजपूतांपैकी हे एक प्रमुख घराणे आहे . हे घराणे ख्रि.श. 7 व्या शतकात सत्तेवर होते . राजस्थानातील अजमेर या ठिकाणी त्याने आपल्या राज्यकारभारास सुरूवात केली . अजयराज , चौथा विग्रहराज व तिसरा पृथ्वीराज हे 12 व्या शतकातील पश्चिम भारतातील अत्यंत पराक्रमी राजे होते . पराक्रमी अशा पृथ्वीराजांनी बुंदेलखंडातील चंदेलांचा पराभव करुन महेब व कालिंजर जिंकले . सिंध प्रांतापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार करावा अशी मोहम्मद घोरीची इच्छा होती . त्यामुळे पृथ्वीराज चौहान व मोहम्मद घोरी यांच्यात ‘ तरायन ' या ठिकाणी युद्ध झाले . या युद्धात पृथ्वीराजने मोहम्मद घोरीला पळवून लावले . या युद्धात जखमी झालेल्या घोरींनी पुढच्या वर्षी परत तरायन या ठिकाणी पृथ्वीराज बरोबर युद्ध करुन त्याचा पराभव केला . पृथ्वीराज चौहान हा राजा रजपूत घराण्यातील पराक्रमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो . रजपूतांचे योगदान.

                      B- मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये

मूलभूत कर्तव्ये हक्क आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . कर्तव्यांशिवाय हक्कांना काहीही महत्व / मूल्य नाही . घटनेच्या 42 व्या दुरुस्तीनुसार 4 अ भागात कलम 5 अ मध्ये 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला होता . 2002 साली 86 व्या दुरुस्तीनुसार आता 11 मूलभूत कर्तव्ये आहेत .
 ती खालील प्रमाणे 
1 ) राष्ट्रध्वज , राष्ट्रगीत व राज्यघटनेचा आदर करणे . 
2 ) स्वातंत्र्य प्राप्तीसाठी राष्ट्रीय चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करणे .
 3 ) भारताची अखंडता जपणे . 
4 ) मातृभूमीचे रक्षण करणे . 
5 ) भारतीयांमध्ये बंधुत्वभाव व निष्ठा वाढीस लावणे . 
6 ) आपला अमूल्य वारसा जतन करणे . 
7 ) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन वृध्दींगत करणे .
 8 ) वैज्ञानिक दृष्टीकोन व चौकसबुध्दीचा विकास करणे . चर्चा करा :
 9 ) सार्वजनीक मालमत्तेचे संरक्षण करणे . भारताचे नागरिक म्हणून आपण जसे आपले मूलभूत हक्क
 10 ) वैयक्तिक व सामूहीक सर्वांगिण उपभोगतो तसेच आपली मूलभूत कर्तव्ये विकासासाठी प्रयत्न करणे . देखिल पार पाडली पाहिजेत 
11 ) 6 ते 18 वयोगटातील मुलांना पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे . मूलभूत हक्कांप्रमाणे कर्तव्यांना न्यायालयाकडून कायद्याचे संरक्षण नाही . परंतु जे आपल्या कर्तव्यात कसूर करतात त्यांना कायद्याने शिक्षा होवू शकते . राज्याच्या धोरणांची अधिकृत तत्वे : समाजहितकारी राज्यव्यवस्थापनेच्या हेतूने घटनेमध्ये राज्यांच्या काही अधिकृत तत्वांचा व धोरणांचा समावेश करण्यात आला आहे . ही तत्वे आयर्लंडच्या घटनेतून घेतली गेली होती . ही तत्वे केंद्र व राज्य सरकारला दिशा दाखविण्याचे काम करतात . याव्दारे सरकार आपल्या नागरिकांना आर्थीक , सामाजिक व राजकीय न्याय देवू शकते . परंतू ही तत्वे नितीमत्तेवर.
                     आधारित असल्याने जर केंद्र व राज्यात त्याची अमंलबजावणी झाली नाही तर न्यायालय त्यांना कायदेशीरपणे जाब विचारु शकत नाही . ही तत्वे समाजवादी व उदारमतवादी असून गांधीजींच्या आदर्शावर आधारित आहेत . ती पुढील प्रमाणे
 1 ) सर्व नागरिकांना पुरेशी उदरनिर्वाहाराची साधने उपलब्ध करुन देणे . 
2 ) समाइक संपत्ती आणि उत्पादन साधने काही ठरावीक लोकांची वैयक्तीक मालमत्ता बनण्यापासून रोखणे . 3 ) स्त्री - पुरुषांना समान कामासाठी समान मोबदला देणे आणि कामगारांचे स्वास्थ जपणे . 
4 ) वृध्द , रोगी , दुर्बल व असहाय्य घटकांना राष्ट्रीय मदत पुरविणे .
 5 ) देशामध्ये सर्वत्रा समान नागरी नियमांचा अवलंब करणे
 6 ) 6 वर्षाखालील सर्व मुलांना आरोग्यविकासाची व पूर्वशालेय विकासाची संधी उपलब्ध करुन देणे .
 7 ) ऐतिहासिक स्मारकांचे रक्षण करुन ऐतिहासिक वारसा जपणे . 8 ) कार्यकारी मंडळ व न्याय व्यवस्था वेगळी करणे . 
9 ) आंतरराष्ट्रीय शांतता जपणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे . 
10 ) ग्रामपंचायतींची स्थापना करणे .
 11 ) ग्रामीण व कुटिरोद्योगांना प्रोत्साहन देणे .
 12 ) आधुनिक पध्दतीने कृषीविकास व पशुसंवर्धनाचे व्यवसाय करणे . 
13 ) दारुबंदीची हमी देणे . 
14 ) शास्त्रीय पध्दतीने कृषीविकास करण्याची हमी देणे . राज्याच्या धोरणांबाबतची ही अधिकृत तत्वे अत्यंत महत्वाची असून समाजहित साधणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे . मूलभूत हक्क हे व्यक्तीशी संबंधीत असतात . राज्याच्या धोरणाची अधिकृत तत्वे ही संपूर्ण समाजाशी संबंधीत असतात . केंद्र व राज्य सरकार ही सर्व तत्वे अंमलात अणण्याचा प्रयत्न करतात . ही तत्वे भारताच्या सर्वागिण विकासाची दिशादर्शक आहेत .

                                  भारतातील प्रसिद्ध विचारवंत

 



ख्रिश्चनत्व



Comments

Popular posts from this blog